प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दर आणि एफ आर पी बाबत शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन होत आहेत,
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तात्काळ तोडगा काढावा,
कारण सध्या साखर उद्योग अडचणीत आहे,
अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मार्ग काढावा असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.
