जनतेज न्युज

ऊस प्रश्नावर शेतकरी संघर्ष समिती आक्रमक ; कारखानदारांच्या विरोधात ऊस रोको आंदोलन सुरू..!

प्रतिनिधी , बीड : गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या माजलगाव तालुक्यात रिक्त उसाचा प्रश्न निर्माण होत असल्यानं ऊस शेतकरी अडचणीत आलाय.तर माजलगाव तालुक्यातील 3 कारखान्यांनी परजिल्ह्यातील ऊस आयात केलाय.तर 140 वाहने गेटकेनला परभणी जिल्ह्यात टाकल्याने , कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आलाय.यामुळं शेतकरी संघर्ष समिती माजलगावच्या वतीने ऊस रोको आंदोलन सुरू करण्यात आलंय. माजलगाव पाथरी महामार्गावर असणाऱ्या , सोमठाणा परिसरात भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या ठिय्या सुरू असून ऊसाची वाहनं आली तर अडवण्यात येणार आहेत.