बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त 150 शेतकऱ्यांनीच केली मका खरेदीसाठी नोंद..
प्रतिनिधी , बारामती : राज्य शासनाकडून मकेला 1850 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला असून यात मकेची सातबाऱ्यावर नोंद असणे गरजेचे आहे आणि शासनाच्या दिलेल्या अवधीमध्येच नोंद करणे बंधनकारक आहे या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी शासनाकडून मकेला 1850 रुपये एवढा चांगला भाव जाहीर केला असताना देखील शेतकऱ्यांनी मका नोंदणी कडे पाठ फिरवल्याचे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत चित्र दिसून येत आहे..
