जनतेज न्युज

ऍमेझॉन प्राईम साऱ्या देशाने डिलिट करावे

प्रतिनिधी : हिंदू देवी देवतांची विटंबना या देशात खापवून घेतली जाणार नसून ऍमेझॉन प्राईम वरील तांडव या सिरीज वरून सुरु झालेल्या वाद आता उग्र रूप घेत असल्याचे दिसून येत आहे.
आज दुपारी 12 च्या सुमारास आमदार राम कदम यांनी बांद्रा कुर्ला संकुल येथील पोलीस स्थानकातील सायबर शाखेत जाऊन ऍमेझॉन वरील तांडव सिरीज त्वरित बंद करण्याची मागणी केली व यासोबतच साऱ्या देशाने आमझोन अँप डिलीट करण्याचे सुद्धा आवाहन केले. व ऍमेझॉन ने तात्काळ माफी मागावी असे आवाहन केले.
या वेळीस भाजपा कार्यकर्त्यांनी ऍमेझॉन अँप बंद करण्या च्या घोषणा दिल्या.