जनतेज न्युज

एकनाथ खडसे यांच्या उपस्थित वंचित च्या जिल्हाध्यक्षांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

प्रतिनिधी , जळगाव : बुलढाणा जिल्ह्यातील तरोडा ,धामणगाव, बडे टाकळी येथील१५० कार्यकर्त्यां सह बहुजन वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भारतीय जनता पार्टी व इतर पक्षातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे आज बहुजन वंचित आघाडीचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवरती राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी एकनाथराव खडसे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे उपस्थित होत्या