जनतेज न्युज

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात नंदुरबार मध्ये काँग्रेसचा भव्य मोर्चा..

प्रतिनिधी , नंदुरबार : केंद्र शासनाचा शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात नंदुरबारमध्ये काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर पालकमंत्री के सी पाडवी यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती पासून सुरु झालेल्या या रॅलीत मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या ट्रॅक्टर सह सहभागी झाले होते. भाजपा सरकारने आणलेला हा कायदा शेतकरी आणि कामगार विरोधी असून या कायदा जो पर्यंत मागे घेतला जात नाही तो पर्यंत काँग्रेस आंदोलन सुरू ठेवणार आहे.आज नंदुरबार आणि धडगाव या दोन ठिकाणी काँग्रेसकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार येथील मोर्चात जवळपास 500 पेक्षा अधिक ट्रॅक्टर आणि शेतकरी सहभागी झाले होते पालकमंत्री पाडवी यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत या मोर्चाचे नेतृत्व केले यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी ,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी व कार्यकर्ते ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते …