प्रतिनिधी , धुळे : दिवाळी तोंडावर आली तरी एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासूनचे वेतन अद्यापही देण्यात आले नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांसह धुळ्यातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने घरासमोर बसून आक्रोश आंदोलन करण्यात आले.
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नसल्याने कर्मचारी प्रचंड तणावात आहे. आज राज्यासह धुळ्यात एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी आपल्या परिवारासोबत आंदोलन करण्यात आले. मात्र जळवाग येते एका एसटी कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मनोज चौधरी असे आत्महत्या केलेले कर्मचाऱ्याचे नाव आहे. ठाकरे सरकारच्या तसेच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कार्य शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, चिठ्ठी लिहून या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने आता ठाकरे सरकार विरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहे. येणाऱ्या काळात एसटी कर्मचाऱ्याच्या वतीने आंदोलन आक्रमक करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
