जनतेज न्युज

एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा होताच धाराशिवमध्ये समर्थकांचा जल्लोष

प्रतिनिधी, उस्मानाबाद : नविन होत असलेल्या भाजप – शिंदे गटाच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना स्वतः फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला .श्री शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच आमदार प्रा तानाजी सावंत समर्थकांनी सुरज साळूंके यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याची आतीषबाजी करून पेढे वाटत जल्लोष केला .