प्रतिनिधी, ठाणे : नवनिर्वाचित मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर लुईस वाडी परिसरात शिंदे समर्थकांनी फोचून पेढे भरवून जल्लोष साजरा केला. सध्या शिंदे समर्थक जमण्यास गर्दी करण्यास सुरवात केली आहे. तसेच शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली. पेढे देखील वाटले.एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावरून मुंबईच्या दिशेने रवाना होताना एकनाथ शिंदे यांचे कुटुंब.राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या ठाण्यातील घराच्या बाहेर फटाके फोडून दिवाळी साजरी केली.. त्याच बरोबर एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे, वडील संभाजी शिंदे, श्रीकांत शिंदे यांची पत्नी वृषाली शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा नातू रूद्र श्रीकांत शिंदे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांचे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
