प्रतिनिधी, मुंबई :
- मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करुन देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेवर रिमोट कंट्रोल ठेवण्याचे काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
- निवडणूक आयोग कोणत्या गटाला मान्यता देईल हे स्पष्ट नसताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे म्हणजे ख-या अर्थाने एका दगडात दोन पक्षांचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याची टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.
- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भाजप त्यांना स्वतंत्र निर्णय घेऊ देतील की नाही हे माहीत नाही परंतु मुंबई, ठाणे, कल्याण – डोंबिवली या महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंचा उपयोग करून शिवसेनेला संपवण्याचा डाव भाजपने रचला असल्याचे महेश तपासे म्हणाले.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शुभेच्छा देत महेश तपासे यांनी रिमोट हा नागपूरहून चालवला जाणार यात दुमत नाही असेही म्हटले आहे.
