जनतेज न्युज

एकलव्य संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलनांचा इशारा…

पाचोरा येथील एकलव्य संघटनेच्या आढावा बैठकीत एकमताने झाला निर्णय…
जळगाव, प्रतिनिधी: पाचोरा येथे एकलव्य संघटना पाचोरा तालुका कमिटी आढावा बैठक शासकीय विश्राम गृह पाचोरा येथे एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीला पाचोरा तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील आदिवासी भिल्ल समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली व जिल्हाध्यक्ष सुधाकरराव वाघ यांनी पाचोरा तालुक्यातील भिल्ल समाज बांधवाच्या समस्या समजून घेतल्या पाचोरा तालुक्यातील भिल्ल समाज बांधवाची सर्वात मोठी समस्या हि शबरी घरकूल योजनेच्या बाबतीत असून जागा नावे नसल्या कारणांमुळे योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे समोर आले आहे प्रशासनातील जातीयवादी अधिकारी हेतुपुरस्सर आदिवासी समाजातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरकुल योजनेच्या लाभा पासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील गरजु गरिब लाभार्थी आजही कुळाच्या झोपडीत आपला संसार सुरू आहे. सध्या पाऊसाचे दिवस असल्याने आदिवासी भिल्ल समाजातील असंख्य नागरिक आजही झोपडीत राहात आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी जोरदार पाऊस झाल्यास झोपडीत पाणी शिरते त्यामुळे पाऊसाच्या दिवसात तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशी व्यथा अनेकांनी मांडली असता यावर जिल्हाध्यक्ष सुधाकरराव वाघ यांनी सांगितले की असा कुठल्याही नियम नाही शासन जीआर नुसार लाभार्थी जर ग्रामपंचायतच्या जागेवर राहात असेल व ती जागा त्यांच्या नावे नसेल तरी त्याला त्याच जागेवर घरकुलचा लाभ भेटायला पाहिजे मग ते शबरी घरकुल योजना असोत की प्रधानमंत्री घरकुल योजना असो जर का ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी हे प्रश्न सोडवत नसती तर आपल्याला संघटनाच्या माध्यमातून लवकरच आपण पाचोरा तालुक्यात आंदोलन ह्या संदर्भात करावें लागणार असल्याचे ही चर्चेत सांगण्यात आले. त्यास बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच विविध प्रकारच्या समस्या बैठकीत मांडण्यात आल्या रेशनकार्ड ,जातीचे प्रमाणपत्र, दफनभूमी ह्या सर्व समस्या जिल्हाध्यक्ष यांच्या समोर मांडण्यात आल्या या वेळी बैठकीला एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष रविभाऊ सीनवणे पाचोरा तालुकाध्यक्ष गणेश वाघ भडगावं तालुकाध्यक्ष संजुबाबा सोनवणे विध्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार पाचोरा उपाध्यक्ष दादाभाऊ भिल्ल विध्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष कैलास सोनवणे गणेश नाईक भगवान मोरे सुनिल सोनवणे आकाश भिल व पाचोरा तालुक्यातील भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.