जनतेज न्युज

संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक मधे विठ्ठल रूख्मीणी व राधा कृष्ण मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

प्रतिनिधी ,अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक गावातील विठ्ठल रूखमीनी व राधा कृष्ण यांच्या मुर्तीचे प्राणप्रिष्ठा आज रविवारी करण्यात आलीये.तालुक्यातील कोठे बुद्रुक गावात स्वयंमसेवकांनी घरोघरी जाऊन धान्य गोळा केले व या धान्यातच एक दवस अगोदर या मुर्ती नियमाप्रमाने ठेवन्यात आल्या होत्या.त्यानंतर स्थापित देवतांचे पुजत म्हनजेच मुर्ती प्रतिष्ठा व बलिदान , पुर्णाहुतीचा कार्यक्रम आज सकाळी आठ ते दहा या वेळेत पार पडला तर दुपारी या सर्व मुर्तीची मिरवुन गावातुुन काढण्यात आली.व तत पश्चात मोठा आरतीचा कार्यक्रम देखी पार पडला.या कार्यक्रमाला गावातील लहानग्यांपासुन तर वडील धारी मंडळीही उपस्थित होते.ऐकुनच कोरोनाचे सर्व नियम बाळगुन मास्क सामाजिक अंतर राखत कोठे बुद्रुक गावामधे हा मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज रविवारी पार पडला आहे.