करटोलीच्या रानभाजी दोन शे रुपये किलो दराने विक्री…
जळगाव, प्रतिनिधी: करटोली ही रानभाजी जुन महिन्यात बाजारात येण्यास सुरुवात होते. उत्तम पोषण व औषधी मुल्य असलेल्या या रानभाजीला मोठी मागणी असते त्याप्रमाणे त्याची निर्यात देखील आता होत आहे.या रानभाजीला महाराष्ट्र नव्हे तर परराज्यात देखील मोठी मागणी असते.
ही एक पावसाळ्यात मिळणारी फळभाजी आहे. ही भाजी दिसते कारल्यासारखी आणि कडूही असते. करटोली या वनस्पतीला कारटोली,कंटोली, रानकारली, कर्कोटकी, करटुली अशीही स्थानिक नावे आहेत. करटोलीचे वेल जंगल परिसरात आढळतात. करटोलीचे वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. करटोलीच्या भाजीच्या सेवनामुळे अनेक आजारांना दूर ठेवले जाते त्यामूळे या भाजीला एक शक्तीशाली भाजी म्हणतात. या भाजीची निर्यात मोठया प्रमाणात होते.शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अँटीऑक्सिडंन्ट्स देखील असतात. करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे.
पाचोरा येथील बाजारपेठेत या भाजीची मागणी चांगली असते.
या भाजीला 200 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे
