पोलिसांनी प्रशस्तीपत्रक देऊन केला सन्मानित
प्रतिनिधी, कल्याण : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी ‘एक कॅमेरा समाजासाठी, देशासाठी,’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पोलिसांनी कल्याण पूर्वेतील दुकानदारांना दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहनही पत्राद्वारे केले होते पोलिसांच्या या आव्हानाला लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटनेने मोठ्या प्रमाणात साथ देत कोळसेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत 243 सीसीटीव्ही कॅमेरे ,रस्त्याकडे तोंड करून लावण्यात आले पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेल्या 18 जणांचा पोलिसांनी सत्कार केला असून या सर्वांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले यावेळी कल्याण एसिपी उमेश माने पाटील, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख,उद्योगपती संजय गायकवाड माजी नगरसेवक महेश गायकवाड ,निलेश शिंदे, शितल मंढारी, संजय मोरे, संजय शिर्के, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश शंकलेशा, नॅन्सी फायनान्सचे मालक शाबू चेरियन, रोहिदास पाटील, जैन , सह लोकप्रतिनिधी व्यापारी वर्ग उपस्थित होते
