जनतेज न्युज

तब्बल घरफोडीचे 41 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला अटक; कोळसेवाडी पोलिसांची कामगिरी

घरफोड्या करण्यासाठी बनवली होती कटावणी

प्रतिनिधी, कल्याण : घरफोड्या करताना टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवत मुंबई ठाणे परिसरात तब्बल 41 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला कोलशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मूळचा तामिळनाडूमधील नारायण तेवर हा फिरस्ता आहे , नारायण  गेली अनेक वर्ष मुंबई ,ठाणे सह आसपासच्या भागात  घरफोड्या सारखे गुन्हे करत होता. मागील तीन महिन्यापूर्वी  एका गुन्ह्या शिक्षा  भोगून जेलमधून परतला होता. व्हीओ : काही दिवसांपूर्वी कल्याण कोळशेवाडी परिसरात एका किराणा दुकानामध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती .कोसळेवाडी पोलिसांचे गस्ती पथक गस्त घालत असताना त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले .पोलिसांना तत्काळ घटना स्थळी तपास सुरू केला पोलिसांना मोबाईल आढळून आला .सदर मोबाईल व परिसररातील  सीसीटीव्ही च्या आधारे या चोरीचा तपास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली  एपीआय हरिदास बोचरे यांच्या टीमने सुरू केला .तपासादरम्यान सदर चोरटा कल्याण आनंदवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीसाना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंदवाडी परिसरात सापळा रचत नारायण तेवर या सराईत  चोरट्याला अटक केली . नारायण हा सराईत चोरटा असून त्याने त्याच्या विरोधात मुंबई ठाणे परिसरात घरफोड्या केल्या होत्या .विशेष म्हणजे घरफोड्या करताना दुकानाचे घराचे  टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवून घेतली होती .मुंबई ठाणे परिसरात त्याने तब्बल 41 घरफोड्या केल्या असून दोन गुन्ह्यांची कबुली त्याने दिल्याची माहिती कोलशेवाडी पोलिसांनी दिली . त्याच्या