प्रतिनिधी , बीड : अपंग असलेल्या व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांमध्ये विषेश सवलत दिली जाते. विशेषत: शासनाच्या एसटी महामंडळाने अपंगव्यक्तीच्या प्रवासासाठी आसन आरक्षीत ठेवलेले आहे. मात्र एसटीच्या प्रवासादरम्यान खरंच अपंग व्यक्तींना या सवलतीचा लाभ मिळत नसून बोगस अपंग प्रवासी याचा लाभ घेतांना दिसत आहे.
खरे अपंग प्रवासी या सवलती पासुन वंचीत असल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. अपंग नसतानाही शासनाच्या विविध योजनांचा लाभ बोगस लाभार्थी घेत आहेत. त्यामुळे खऱ्या अपंगांना या सर्व योजनांपासून वंचीत राहावे लागत आहे. मयाबाबतीत आगार प्रमुखांना विचारले असता, आम्ही या विषयी मोहीम चालु केली असुन बोगस अपंग प्रवाशी आढळल्यावर त्यांच्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक वाघदरीकर यांनी सांगितले आहे. तर, सामाजिक कार्यकर्ते कडुदास कांबळे यांनी खऱ्या अपंगांना सर्व सवलती द्या नाहीतर रस्त्यावर उतरू अशा इशारा दिला आहे.
