जनतेज न्युज

निवृत्ती वेतनात बदल करण्यासाठी शिक्षिकेकडून १ हजाराची लाच घेताना हेडमास्तर गळाला

प्रतिनिधी , उस्मानाबाद : शाळेतील निवृत्त शिक्षिकेचे DCPS(परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना ) हे NPS(केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजना ) मध्ये वर्ग करण्यासाठी हेडमास्तर ( मुख्याध्यापक ) शाहूराज दत्तू भोजगुडे , वय 54 वर्ष,व्यवसाय-नोकरी ( मुख्याध्यापक, गांधी विद्यालय, चिखली, ता. जि. उस्मानाबाद रा. समता नगर उस्मानाबाद) यांनी तक्रारदार याना 1000/- रुपये लाच रकमेची मागणी करून 1000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. याबाबत पो स्टे बेंबळी, ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे .कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) यांनी केले आहे.