प्रतिनिधी , राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसींचे प्रश्नांवर आक्रमक असून ओबीसीचा हक्क त्यांना मिळावा इतर आरक्षणाप्रमाणेच ओबीसींनासुद्धा सर्व सुविधा मिळाव्या, शिक्षण, नौकरी आदी ठिकाणी आरक्षणाचा समान हक्क मिळावा , आणि यासाठी ओबीसी समाजाची जनगणना झालीच पाहिजे, त्यांच्यावरील अन्याय दूर झाला पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी केलंय.
ओबीसीच्या मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात ओबीसी महासंघाच्या वतीने अधिवेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.आज बुलडाणा जिल्ह्यात विदर्भ स्तरीय महाधिवेशन आयोजित केले होते, या अधिवेशनाला राज्याचे मदत व पुनर्वासन मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय… तर यावेळी काँग्रेस नेते दिलीप सानंदा, तसेच ओबीसी नेते उपस्थित होते.
