जनतेज न्युज

विज बिल वाढविण्याच्या बाबतीत कुठलाच प्रस्ताव नाही आहे ना. गुलाबराव पाटील.

प्रतिनिधी , जळगाव : विज बिल वाढविण्याच्या बाबतीत कुठलाच प्रस्ताव नाही आहे विज बिल शेतकऱ्यांवर जे आहे त्याच्यावर 50% माफी द्यावी व्याज सरसकट माफ कराव अशा पद्धतीच्या ठराव कॅबिनेटमध्ये झालेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे असे ना.गुलाबराव पाटील( पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांनी सांगितले आहे. राज्यपाल नियुक्त असल्यामुळे सर्वस्वी अधिकार राज्यपालांच्या असल्यामुळे ती दिरंगाई होते आहे लोकशाहीमध्ये जर अशा पद्धतीच्या जागा असतील तर आमची राज्यपालांना विनंती असणार आहे ती त्या लोकप्रतिनिधींना लवकरात लवकर त्या जागेवर नियुक्ती करावे अशी प्रतिक्रिया नागुलाबराव पाटील( पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांनी दिली