प्रतिनिधी , उस्मानाबाद – औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराचा मुद्दा गाजत असतानाच, केवळ महानगरपालीका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण सुरू असल्याचा संशय मनसे कडुन व्यक्त केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी एकाच वेळी संभाजीनगर व धाराशिवची घोषणा केल्याची आठवण करून देत संभाजीनगर सोबतच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उस्मानाबाद कडून केली गेली आहे .
