जनतेज न्युज

औरंगाबाद जिल्ह्यात निर्बंधमुक्त करण्यासाठी पुन्हा लावले निर्बंध

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज सोमवार 7 मार्च रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग हा कमी न झाल्याने पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. आता जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर ते लसीकरणाचे दोन्ही प्रमाणपत्र बघून पेट्रोल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ७ मार्च रोजी दिले आहेत. किराणा संबंधित पेट्रोल पंपावर ती कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र न पाहता पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंपावर ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली आहे. राज्य शासनाने निर्बंध संदर्भात पाठवलेल्या लिस्टमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे नाव नसल्याने औरंगाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात लसीकरण याच्या संदर्भात निर्बंध लावण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. सदरील पत्रकार परिषद ही जिल्हाधिकारी कार्यालयात आज रोजी संपन्न झाली आहे.