जनतेज न्युज

रेल्वेत प्रवाशांना लुटाणारी टोळी गजाआड ; घटना सीसीटीव्हीत कैद

प्रतिनिधी, नवी मुंबई : 6 तारखेला फिर्यादी कुर्ला ते वाशी रेल्वे प्रवास करत असताना,मानखुर्द रेल्वे स्टेशनला तीन व्यक्ती गाडीत चढून, फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडे असलेले मोबाईल आणि आणि रोख रक्कम लुटली,मात्र गाडी वाशी रेल्वे स्टेशनला पोहचताच आरोपी पळून जात असताना,फिर्यादीने चोर चोर असा आवाज देताच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून दोन आरोपींना ताब्यात घेतले,ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.त्यांची चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार निघाले असून,त्यांच्यावर अनेक ठिकाणी अशा प्रकारचे लुटीचे गुन्हे दाखल आसल्याचे समोर आले आहे,त्यांच्या माहिती नुसार फरार आरोपीलाही अटक केली असून,आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून  अजून काही गून्हे उघड होणार असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली…