प्रतिनिधी , औरंगाबाद:-आज सोमवार 2 ऑगस्ट रोजी औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक दरवाजांची पडझड संदर्भात माहिती घेतली,
असता शहराची ओळख 52 दरवाजे यांची होती.
त्यात शहरात प्रवेश करणारा महत्त्वाचा दरवाजा म्हणजेच दिल्लीगेट तर शहरात छावणी परिसरातून येण्यासाठी बारामुल्ला दरवाजा,
घाटी रुग्णालय आणि पानचक्की तसेच खाम नदीच्या कडेला असलेला हा दरवाजा नष्ट होण्याच्या मार्गावर असून,
मात्र स्मार्ट सिटी च्या नादात मनपा ऐतिहासिक वस्तूंची विसर पडली की काय असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडत आहे,
त्याला कारणही तसेच असून कारण शहरातील 52 इतिहासिक दरवाजांपैकी बोटावर मोजता येईल एवढीच दरवाजा शहरात शिल्लक असून आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख असून कारण पर्यटकांना शहरात आल्यानंतर शहरातील बीबी का मकबरा ,पानचक्की ,सोनेरी महल, औरंगाबाद लेणी,
आणि
शहरात फिरताना शहरातील ऐतिहासिक दरवाजे दिल्ली गेट, रंगीन दरवाजा , मकाई गेट, पैठणगेट, भडकल गेट, बारामुल्ला दरवाजा,
असेच दिसून येतात मात्र आता शहराचा इतिहास सांगणारे हे दरवाजे शेवटची घटका मोजत आहे,
बाकी दरवाजे नष्ट झाली तशीच हे दरवाजे नष्ट होतात की काय असा मोठा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे दरवाजा हा अरुंद असल्याने यात नेहमीच वाहनांची धडक बसते पावसाने पडझड सुरू आहे या दरवाजाचे अनेक भाग पडले असून मनापा नाही ते लोखंडी पाइप लावले होते मात्र काही दिवसांपूर्वी एका क्रेन या वाहनांच्या धडकेत तुटून पडले मात्र मनपाने तातडीने दुरुस्ती केली असे वाटत होते मात्र मनपाने याकडे लक्ष दिले नाही एकीकडे स्मार्ट सिटी च्या नावाखाली केंद्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मनपाला दिला मात्र याचा उपयोग या ऐतिहासिक वस्तू वाचवण्यासाठी का होत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे अशीच परिस्थिती असलेल्या शहरातील ही इतिहासिक दरवाजे नष्ट होतील याची जबाबदारी कोण घेणार असा मोठा प्रश्न नागरिकांनी उभा केला आहे.
