प्रतिनिधी , सोलापुर : कर्नाटकात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळेच तिथे सीमावाद चिघळत आहे. त्याठिकाणी भाजपचे सरकार असल्याने महाराष्ट्र सरकारचे ऐकलं जाईल का ? अशी शंका उपस्थित करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केली आहे. तसेच सीमावादावर राजकारण न करता सर्वांनी मिळून तोडगा काढावा असे आवाहन त्यांनी केल आहे.
वीज बिल माफीवर बोलताना त्यांनी भाजप सरकार सत्तेतून पायउतार होताना वीज मंडळाला 55 हजार कोटींचे नुकसान झाल असल्याच सांगितले. तसेच केंद्राने शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं, त्यांच प्रमाणे अण्णा हजारे यांच्या ३० जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्याच बरोबर भाजपचे अनेक आजी – माजी आमदार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याचही रोहित पवार म्हणाले आहेत. कोरोना व्हॅक्सिन बद्दल बोलताना, एका लसी बाबत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात भीती असल्यामुळे आरोग्य कर्मचारी ही लस घेत नसल्याच त्यांनी सांगितले.
आज पंढरपुर येथिल दौऱ्यावर असतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाच दर्शन घेत, बा विठ्ठला.! जगाला कोरोनातून मुक्त कर, आणि प्रत्येकाला उत्तम आरोग्य दे असे साकडे घातले.
