जनतेज न्युज

कर्नाटक सीमावादावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना फटकारले

प्रतिनिधी , महाराष्ट्र : कर्नाटक सीमावादावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना फटकारले आहे. असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवादसाधताना सवदी यांच्यावर टीका केली. असे येडे बरळतच असतात, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सागंतिलं तेच योग्य आहे. हा केवळ कर्नाटकचा प्रश्न नाही. तर दोन राज्यांच्या सीमांचा प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. मुंबईतील कानडींवर आम्ही कोणतीही सक्ती केली नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांच्या शाळाही इथे आम्ही चालवतो. त्यांच्या संस्थाही महाराष्ट्रात चालतता. तशी परिस्थिती बेळगावमध्ये आहे का? बेळगावमध्ये मराठीचं काय स्थान आहे? असे सवाल करतानाच कानडी लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगत नाही. आम्ही फक्त कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या कानडी लोकांशी बोलावं, असंही राऊत म्हणाले.