जनतेज न्युज

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी लक्षणीय उपोषण …

प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांबाबत राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने दिनांक 27, 28 व 29 जानेवारी 2021 रोजी राज्यव्यापी लक्षणीय उपोषण पुकारले आहे.
दिनांक 27 जानेवारी रोजी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले, दिनांक 28 रोजी काळ्या फिती लावून काम करून दुपारी एक ते दोन जेवणाच्या सुट्टीत तीव्र निदर्शने करणार आहेत व दिनांक 29 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस पुकारलेल्या संपा प्रमाणे जिल्हानिहाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्हा परिषद कार्यालयासमोर लाक्षणिक संप करणार आहेत याबाबतचे निवेदन बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समिती कार्यालयाचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांना कर्मचाऱ्यांनी दिले आहे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या लाक्षणिक उपोषणास गेवराई तालुका ग्रामसेवक संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.