जनतेज न्युज

नुकसान भरपाई मिळत नसल्याने राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे उपोषण.

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नांदगाव तांडा ता.किनवट येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरच शेतकऱ्याचे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. 
वारंवार लेखी तक्रार देऊनही संबंधित अधिकाऱ्याकडूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने आजपासून राष्ट्रीय महामार्गावर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेण्यार नाही. अशा हाट शेतकऱ्यांनी धरला आहे.