जनतेज न्युज

साष्ट पिंपळगाव ते औरंगाबाद मशाल रॅली आणि ठिय्या आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

प्रतिनिधी , जातीवादी मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा ने केली
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी आणि इतर मागण्यासाठी वेगवेगळे आंदोलन सुरू आहे याची सुरुवात ही दिनांक 20 जानेवारी रोजी सास्ट पिंपळगाव, कोल्हापूर आजाद मैदान या ठिकाणी काढण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सस्ट पिंपळगाव येथून माशाळ रॅलीला सुरुवात करून औरंगाबाद येथे दुपारी तीन वाजता मशालीचा समारोप हा क्रांती चौक या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
आरक्षणा मधून नियुक्ती झालेल्या एमपीएससी व इतर विभागातल्या तरुणांना नोकऱ्या वर सामावून घेतले नाही या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी नव्याने सुरू केलेली नोकर भरती रद्द करावी व जातीवादी मंत्री विजय वड्डेटीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा ने केली आहे