प्रतिनिधी , अहमदनगर : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारी पासून आपल्या कृषी मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. या निमित्ताने आज गुरुवारी सकाळीच माजी मंत्री आणि भाजप सरकार मधील संकतमोचक गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी मध्ये अण्णांची भेट घेत केंद्र सरकारने नव्याने दिलेला प्रस्ताव अण्णां समोर सादर केला. या भेट नंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनो आज झालेली चर्चा सकारात्म असल्याचे सांगत अण्णांनी मागणी केलेली उच्चाधिकार समिती गाठोत6होऊन तातडीने निर्णय होणार आहे, त्यावरील नवीन प्रस्ताव उद्याच (शुक्रवारी)) अण्णांना सादर केला जाईल. आंदोलनाची वेळ अण्णांवर येणार नाही असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला. या वयात अण्णांनी आंदोलन करू नये म्हणून पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांना काळजी आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री उद्या (शुक्रवारी) केंद्राचा प्रस्ताव घेऊन स्वतः येतील याचे सुतोवाच महाजन यांनी केले. प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचाराचा महाजन यांनी यावेळी निषेध केला.
बाईट-गिरीश महाजन -माजी मंत्री
