जनतेज न्युज

या गोष्टीचं मला दुःख झाले आहे:-रक्षा खडसे खासदार

प्रतिनिधी , जळगाव :- भाजपच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडलेला प्रकाराची माहिती मला काल सायंकाळी झाली. त्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. या प्रकाराची चौकशी सुरू आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसेंनी आज सकाळी जळगावात दिली.
रक्षा खडसे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या संकेतस्थळावर झालेल्या चुकीच्या प्रकाराबाबत आपले मत मांडले.
काय म्हणाल्या रक्षा खडसे?
भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर या विषयाबाबत मी तत्काळ पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही. माझ्याकडे व्हाट्सएपवर याबाबत जे काही स्क्रिनशॉट आलेत, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरून व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरू आहे, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.