तक्रार देऊन कचरा उचलत नसल्याने नागरिक संतप्त ..
कचऱ्याला आग लावून स्थानिक नागरिकाने केला पालिकेचा निषेध …
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेत असलेल्या २७ गावांमधील कचऱ्याची समस्या कायम असून रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर पावसाचे पाणी पडल्यामुळे हा कचरा सडला आहे. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. मात्र वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून हा कचरा उचलत नसल्याने संतप्त नागरिकाने आज कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावाजवळील परिसरात पडलेल्या कचऱ्याला आग लावून पालिकेचे विरोधात घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध करत अनोखे आंदोलन केले आहे
तर या बाबत महानगरपालिकेच्या घनकचरा अधिकाऱ्यांनी पडलेला कचरा उचलला जात असून 27 गाव परिसरात काही लोकं व हॉटेल व्यावसाईक पालिकेच्या घंटागाडी कचरा न देता रात्रीच्या वेळेस मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याने त्याच्या वर कारवाई करणे शक्य नसल्याचे सांगत नागरिकांनी घंटागाडी येत नसेल तर पालिके कडे तक्रार दयावी रस्त्यावर कचरा टाकू नये अशे आव्हान केले आहे
