जनतेज न्युज

कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ,भाजप कार्यकर्ता असल्याचा आरोप

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विनयभंग करणारा भाजप कार्यकर्ता नसल्याचे पोलीसाना दिले निवेदन

प्रतिनिधी , कल्याण कोळशेवाडी : कल्याण कोळशेवाडी परिसरामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यातच गाठत अंधाराचा फायदा घेत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून . पीड़ित मुलीने आरडा ओरड केला असता आरोपीने तिथून पळ काढला प्रकरणी पीडित मुलीने टिळक नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी टिळक नगर पोलीसानी पप्पू सहानी नावाच्या आरोपीला अटक ही केली आहे मात्र आरोपी भाजप कार्यकर्ता असल्याचे आरोप होत असल्याने कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या प्रकरणी राजकारणात सुरू झाले असून त्या आरोपी शी भाजपचा कोणताही संबंध नाही त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी करत आज भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कल्याण झोन 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ निवेदन दिले