प्रतिनिधी ,उस्मानाबाद: जिल्ह्यात कळंब व उस्मानाबाद तालुक्यात पाऊस जास्त झाल्याने तेरणा व मांजरा धरणातुन मोठा विसर्ग सुरू आहे त्यामुळे या नदीकाठच्या गावाना धोका निर्माण झाला असुन कळंब तालुक्यात २७ व उस्मानाबाद तालुक्यात ६ जण आडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली त्याप्रमाणे काही नागरीकांना सुरक्षीत बोहेर काढले आहे तर काहींना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत . तेर ग्रामिण रूग्णालयात पाणी शिरल्याने येथील रुग्णांना मंगल कार्यालयात हलवले असुन नागरीकांनी वहात्या प्रवाहाकडे जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी केले आहे .
