जनतेज न्युज

कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या मारामारी मध्ये एका ग्रामपंचायत सदस्यची हत्या

प्रतिनिधी , कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या मारामारी मध्ये एका ग्रामपंचायत सदस्यची हत्या झाली आहे.पांडुरंग काळे वय वर्ष 55 ,असे मयत सदस्याचे नाव आहे.तर यामारामारी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत.ज्या मध्ये 4 ते 5 जण जखमी झाले आहेत,
जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या झाल्याचा आरोप जखमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे. तबायात पांडुरंग काळे यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला या उपसरपंच निवडली मध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे आपल्या गटातून चार सदस्य फुटले या रागात ना भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला आणि ज्यामध्ये भाजपाचेच ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे यांचा मृत्यू झाला आहे.