प्रतिनिधी , ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजपा नगरसेवक नितीन तेलवणे यांनी काल रात्री 12:40 वाजता एका महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सेक्शन ४५२ ३५४ ३५४-A ५०६ या IPC कलमाच्या माध्यमातुन कारवाई करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
