प्रतिनिधी : संपूर्ण देशभरात केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी विधेयकाविरोधात आंदोलन सुरू असून या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत आहे. त्याचबरोबर देशातील विविध संघटनांनी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला असून गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र अजून पर्यंत केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले नाही.
त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर वंचित बहुजन आघाडी एक दिवसीय धरणे आंदोलन करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांन विरोधात जे तीन काळे कायदे केले आहे ते कायदे मागे घ्यावे अशी प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडी ने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे जदुगरचे खेळ खेळते आहे असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चक्षुपाल बोरसे यांनी यावेळी केला.
