प्रतिनिधी , यवतमाळ : नुकताच राज्य सरकारने मागासवर्गीयांच्या बढतीमधील आरक्षणाबाबत अद्यादेश जारी केला आहे. हा अद्यादेश मागासवर्गीयांवर अन्याय करणारा तसेच संविधानिक तरतुदींचा भंग करणारा आहे. या अद्यादेशाला विरोध करणे शक्य होत नसेल तर सरकारमधील मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भटके-विमुक्त बंजारा तथा ओबीसी नेते, मा. खा. हरीभाऊ राठोड यांनी केली.
फडणवीस सरकारने हे आरक्षण बंद केले करतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेशही दिले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण रद्द करीत असतानाच राखीव ठेवलेल्या 33 टक्के जागांवरही खुल्या प्रवर्गातून भरती करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकार महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वालाही धक्का देणारा आहे, अशी टीकाही हरीभाऊ राठोड यांनी केली आहे.
