जनतेज न्युज

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा निषेध

प्रतिनिधी , औरंगाबाद : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने औरंगाबाद शहराचे नामांतार छञपती संभाजीनगर करण्यात यावे या मागणीला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांंच्या निषेधार्थ शनिवारी (दि.०२) हनुमान चौकात थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
आगामी महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेस च्या उमेदवारांना पाडण्याचे काम मोर्चा संपुर्ण महाराष्ट्रात करणार असुन यासाठी काँग्रेस विरोधात पञके छापुन विभागनिहाय व वार्डनिहाय बैठका घेऊन छञपती संभाजीराजे प्रेमी व मराठा समाजात व मतदारात जनजागृती करून काँग्रेसच्या उमेदवांरांना धडा शिकवला जाईल अशी घोषणाही यावेळी समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केली. पोलिसांनी आंदोलकांच्या हातातून थोरात यांचा फोटो असलेला बॅनर हिसकावून घेतला.
मराठा आंदोलकांना पुंडलीक नगर पोलीसांनी ताब्यात घेतले.