प्रतिनिधी, सांगली : वाळवा तालुक्यातील कापूसखेड गावची कन्या स्रेहल कृष्णा खराडे हिची बिहार येथे सशस्त्र सीमा बल (एस.एस.बी) दलात निवड झाली. राजस्थान येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रथमच गावात आल्यानंतर तीची गावातून मिरवणूक काढत उत्साही स्वागत करण्यात आले. कापूसखेड तसेच परिसरातून पहिली महिला फौजी होण्याचा मान तीने मिळवला. वडील शेतकरी कृष्णा खराडे तर आई संगिता खराडे गृहिणी , घरची परिस्थिती बेताची अशा परिस्थीतही तीने आपले शिक्षण पुर्ण केले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आई -वडिलांची मुलीने सैन्यात भरती व्हावे अशी इच्छा होती. त्याप्रमाणे स्रेहल हीने खडतर परिश्रम घेतले. सैन्य दलात जागा निघाल्यानंतर तीने फॉर्म भरला. गावातील मैदानावर तसेच इस्लामपूर येथे तीने सराव केला. तीन महिन्यापुर्वी तीला प्रशिक्षणासाठी पत्र आले होते. यानुसार ती राजस्थान येथे प्रशिक्षणासाठी दाखल झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती प्रथमच कापूसखेड येथे आली होती. यावेळी ग्रामस्थांनी तीची मिरवणूक काढली. गावात ठिकठिकाणी तीचा सत्कार करण्यात आला.तर आई वडीलांनी कष्टातून मला मोठे केले आहे. त्यांच्या पुण्याईमुळे मला आज देशसेवा करता येणार असल्याचे स्नेहल खराडे यावेळी म्हणाली.
