प्रतिनिधी, मुंबई : आता आम्हाला थोडासा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल की अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते, भारतीय जनता पार्टी आणि आमच्यात काय झाले ते आम्ही बघून घेऊ, तिसऱ्याची आम्हाला जरुरत नाही, आमच्यात जे काही झालं ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही यात पडायची गरज नाही.भारतीय जनता पार्टीचा लाऊडस्पीकर काल शिवाजीपर्कात वाजत होता, स्क्रिप्ट त्यांची होती, टाळ्या त्यांच्या होत्या आणि घोषणा देखील त्यांच्या होत्या,
आपण याकडे लक्ष दिले नाही पाहिजे, काल मराठी भाषा भवनाचे उद्घाटन झाले, मेट्रोचे उद्घाटन झाले म्हणजे मुख्यमंत्री काम करत आहेत नेतृत्व करत आहेत.त्याच्यावर बोला, तुमच्या भोंग्याचे काय करायचे, यांच्या भोंग्याचे काय करायचे, त्यासाठी सरकार समर्थ आहे.शरद पवारांनी जातीवाद बसवला, त्यात शरद पवारांच्या चरणात आपण देखील जात होतात, सल्लामसलत करण्यासाठी, कशा करता आपण टोलेजंग माणसांवर बोलायचं? एवढ्या मोठ्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्या देखील स्पॉन्सर्ड आहेत, काल शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता, महाराष्ट्राला एकच कळलं की अक्कलदाढ उशिरा येते.देशात असे अनेक वेळा होते, शेवटी बहूमत तयार होते, त्याचवेळी सरकार बनते, युतीचे बहुमत झाले नाही महा विकास आघाडीचे बहुमत झाल, आम्ही खोटे बोलणार यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनले आहे,काल त्यांनी मराठी भाषा भवनाचे स्वागत करायला हवे होते, त्याविषयी काही बोलले नाहीत, कोणी फक्त टीका करायची, याने आहे तेसुद्धा गमावून बसाल,भारतीय जनता पक्षाने त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढली, हे आता स्पष्ट दिसते आहे, आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे, राज्यांवर जी संकट येत आहेत त्यांच्याशी लढा द्यायचा आहे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या घुसखोरीआणि अतिक्रमणाच्या विरोधात लढा द्यायचा आहे आणि हे करत असताना शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकवायचा आहे.अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, बीजेपी शासित किती राज्यांमध्ये अजान बंद केली आहे? मशिदींच्या वरून भोंगे काढून टाकले आहेत, जे कायद्यात बसते, त्यानुसार गृहमंत्री काम करतील,
जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत, ती चौकशी चांगले अधिकाऱ्यांकडून व्हायला हवे आणि मला खात्री आहे, त्यांचा मृत्यू हा संशयास्पदरीत्या झालेला आहे
