जनतेज न्युज

काय बाई सांगु, कस्सं ग सांगू – कोरेगावा पार्कात चाललंय काय, मदन मस्तीनं धुमाकुळ घातला हाय…

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई,

कोरेगांव पार्क परीसरात मसाज स्पा सेंटरवर छापा.

वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या  7 इसमांविरुद्ध धडक कारवाई,

2 परदेशी महीलांसह 8 पिडीत महीलांची सुटका.

प्रतिनिधी, पुणे : कोरेगाव पार्क…. देशी विदेशी पर्यटकांचा नेहमी राबता असतो. त्यामुळेच पुणे शहरासह राज्यातील मोठ्या भांडवलदारांनी या भागावर लक्ष केंद्रीत करून, स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्यालये सुरू केली आहेत.  कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव पार्क आणि पुढे कल्याणी नगरपर्यंत हा वेश्याव्यवसाय तुडूंब भरला आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती असतांना देखील ते कारवाई करीत नाहीत. दरम्यान कोरेगांव पार्क पोलिस स्टेशन हद्दीतील ‘ली ब्युटी स्पा’, लिबर्टी सोसायटी, 2 रा मजला, नोर्थ लिबर्टी मेन रोड, लेन नंबर 6, अपोलो फार्मसीच्यावर, कोरेगाव पार्क, पुणे व लगतच्या  ‘द ब्लू हेवन स्पा’, लिबर्टी सोसायटी, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क, पुणे येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्क येथे पंचासमक्ष जावून, डमी कस्टमरसह, सापळा रचून छापा कारवाई करण्यात आली असता, तेथील पीडीत मुलींकडून मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसचे नावाखाली, जादा रक्कम चार्ज करुन, वेश्याव्यवसाय करीत असल्याचे खात्रीपुर्वक निदर्शनास आले. त्यावरुन सदर ठिकाणी पंचनामा करून, सदर स्पा चे काऊंटर वरील मॅनेजर वगैरे काम करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत.

सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहीती ब्लू हेवन स्पा मधील आरोपी

1) इंजमामुल अब्दुल जलील हुसेन, वय 19 वर्षे, धंदा-ब्लू हेवन स्पा मध्ये सहायक मॅनेजर, रा.लिबर्टी सोसायटी, जी- 1 नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क , पुणे, कायमचा पत्ता – रा. कानपुर रोड जामा मजीद बरबारी,जमुनामूख, नागाव, आसाम.

“ली ब्युटी“ स्पामधील आरोपी

2) किरण चंद्रकांत कोळी, वय 29 वर्ष, रा. नेहरूनगर पिंपरी ,पुणे,

तसेच सदर स्पा चे मालक, भागीदार, व्यवस्थापक असे पाहीजे आरोपींची अनुक्रमे नामे पुढीलप्रमाणे आहेत.

सदर गुन्हातील पाहीजे आरोपींची माहीती

3) मुकुल घुले, स्पा भागीदार व फायनान्सर ( पुर्ण नाव पत्ता माहीत नाही )

4) अनुज कुमार राकेश पांडे,

(स्पा मालक/फायनान्सर) वय 31 वर्ष, रा. सर्वे नंबर 281, धानोरी रोड, आनंद नगर, लोहगाव, पुणे

5) अब्दुल बतेने, स्पा मॅनेजर, वय 23 वर्ष रा. मुंढवा चौक, पुणे

मूळचा राहणार आसाम (पुर्ण नांव व पत्ता माहीत नाही)

6) राकेश बालचंद्र घेवरीकर (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही)

7) सोनबा संजय निगडे, ( स्पा जागेचा मूळ मालक), वय 29 वर्षे, रा.202/1 , आसरा बंगलो ,नगर रोड, आगाखान पॅलेसजवळ ,पुणे 

वरील नमूद पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.

सदर स्पा मध्ये मालीश व स्पा बरोबरच लोकांना एक्स्ट्रा सर्व्हिसेस या गोंडस नांवाखाली स्थानिक तसेच परदेशी युवतींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.

 सदर  छापा कारवाईत एकुण 8 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यातील 2 पीडीत महिला ह्या थायलंड या राज्याच्या नागरीक आहेत.

सदर गुन्ह्यात रोख रकमेसह एकूण रु.88,000 /- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

 सदर प्रकरणातील उपरोक्त नमूद आरोपींविरुद्ध कोरेगांव पार्क पोलिस स्टेशन येथे  गु. र. क्र.    56/22, कलम 370, 34 भा.दं.वि. सह पिटा कायदा कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

अशी झाली छापा कारवाई.

सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीसांना मिळालेल्या बातमीची खातरजमा करण्यासाठी, डमी कस्टमरला एका संशयित स्पा मध्ये पाठवले असता, तेथे सर्व प्रथम त्याचा मोबाईल नंबर घेतला गेला. स्पा चे काऊंटर वरील व्यक्तीने सदरचे मोबाईलवर मीस कॉल देऊन तसेच ट्रू कॉलरवर चेक करुन खात्री करुन घेतली. मग त्याला एक्स्ट्रा सर्विसचे नावाने चाललेल्या वेश्या व्यवसायाबाबत संमती दिली. पण त्यावेळी तेथे मसाज सर्व्हिससाठी थाय मुली उपलब्ध नसल्याने लोकल मुलींकडून सर्विस घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. पण डमी कस्टमरने थाय मुलींचाच आग्रह धरल्याने त्यास सायंकाळी येण्यास सांगितले गेले.

 दरम्यान डमी कस्टमरचा मोबाईल क्रमांक हा जस्ट डायल मार्फत इतर स्पा सेंटरला ॲटोमॅटीकली पाठवण्यात आला. त्यानंतर ब्ल्यू हेवन स्पा चे मॅनेजरने, डमी कस्टमरचे मोबाईलवर संपर्क साधून त्याच ब्लू हेवन स्पा मध्ये येण्याचे निमंत्रण दिले. सदरवेळी डमी कस्टमरचे मागणीप्रमाणे थाय मुली कडून एक्स्ट्रा सर्व्हिस देखील हमखास मिळेल असे आश्वासन दिले गेले.

 त्यानंतर पोलीसांनी पंचासमक्ष डमी कस्टमरला पैसे देऊन ब्लू हेवन स्पा मध्ये पाठवले. सदर ठिकाणी काउंटरवरील मुलाने डमी कस्टमरचे मोबाईल क्रमांकाची खात्री करुन त्यास नॉर्मल मसाजचे रु. 1500/- हे त्याचे कडे जमा करणेस सागून, एक्स्ट्रा सर्व्हिससाठी रु. 4000/- ही ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे दुसऱ्या मोबाईलवर जमा करण्यास सांगून, सर्व रक्कम स्विकारलेनंतर, डमी कस्टमरची खात्री झालेनंतर, त्याला सोबत घेऊन, शेजारच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ‘ली ब्युटी स्पा’ वर नेण्यात आले. तेथे थाय मुली कडून एक्स्ट्रा सर्व्हिसचे नावाखाली वेश्याव्यवसाय करुन घेण्यात आला. सदर वेळी डमी कस्टमरने दिलेल्या सांकेतिक इशाऱ्यानंतर पोलीस पथकाने पंचासह आत प्रवेश करुन, रंगेहाथ पकडले.

सदरची छापा कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री. श्रीनिवास घाटगे, मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, मपोह शिंदे, मपोह मोहीते, पोना हनुमंत कांबळे, पोना इरफान पठाण या पथकाने यशस्वी केली आहे.

विशेष म्हणजे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशानुसार सदर कारवाईत  परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांचे एक पथकही सहभागी झाले होते.