प्रतिनिधी, पुणे : पुणे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी श्री. रमेश खामकर यांनी पुणे महापालिकेच्या एलबीटी कार्यालयाजवळील एका गटई कामगाराला सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून, ए, चांभारा, तुझी चांभारी कामाची पेटी पुढे पुढे काय आणत आहेत, ही जागा तुझ्या बापाची वाटली काय रे, चांभारा. लवकर पाठीमागे घे नाही तर अतिक्रमण विभागाला बोलावून तुझे चंबु गबाळ उचलुन न्यायला सांगेन अशी धमकी दिली आहे. तसेच तुला जर इथ चांभारी काम करायचं असेल तर दरमहा मला दोन हजार रुपये (2000/-) दयावे लागतील, नाहीतर तर कारवाई झालीच म्हणून समजा अशी धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेकामी सादर केले असल्याची माहिती चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष संजुभाऊ बनसोडे यांनी पुणे क्राईम न्यूजला दिली आहे.
याबाबत पिडीत फियादी सुनिल रूपचंद चऱ्हाटे गटई कामगार यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे यापूर्वी देखील तक्रार दिली होती. त्यावेळेस श्री. खामकर यांचे विरूद्ध भादवी 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपिठाने देखील सार्वजनिक ठिकाणी अनुसूचित जातीचे इसमांस जातीवाचक शिवीगाळ करणे करणे दंडनिय अपराध मान्य करून आरोपींना 7 वर्षांच्या कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सदर चर्मकार विकास संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांनी देखील पोलीस आयुक्त पुणे शहर व जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देवून श्री. खामकर यांच्याविरूद्ध ॲट्रॉसिटी कायदयानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रसंगी तीव्र धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती मिळते की, श्री. रमेश खामकर हे पुणे महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, ते शासकीय वेळेप्रमाणेच आजही पुणे महापालिकेत येत असतात. तसेच पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यात माहितीअधिकार अर्ज देत असतात. तसेच अधिकाऱ्यांना देखील ते छळत असल्याचे समोर आले आहे. काही अधिकाऱ्यांनी देखील खामकर यांच्या कृत्याविरूद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
