प्रतिनिधी, जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगर विकास खातं आपल्याकडे न ठेवता एकनाथ शिंदे कडे दिले शिवसेनेचे आमदारांच्या व मंत्र्यांचे व नागरिकांच्या कामांची जबाबदारी सोपवली त्यांनी साहेबांचा विश्वासघात केला . शिवसैनिकांनी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहायचे आहे गावागावात जाऊन साहेबांची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे बंडखोरान्वर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेली आहे पक्षाची भूमिका ग्रामीण भागात कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात यावी या भूमिकेसाठी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांची बैठक रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर जिल्हाप्रमुख समाधान महाजन गजानन मालपुरे महिला जिल्हाप्रमुख रोहिनी पाटील उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील तालुका अध्यक्ष राजू बिटवा यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते परंतु या बैठकीला काही पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले यासंदर्भात पारकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले दोन पदाधिकारी आहे ते गुजरात येथे पिकनिक साठी गेले आहेत परंतु या बैठकीला शिवसेनेचे दोघ शहराध्यक्ष नगरसेवक माजी पंचायत समिती उपसभापती महिला तालुकाध्यक्ष असे काही पदाधिकाऱ्यांची गैर हजर जाणवली.
