जनतेज न्युज

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडीचे आयोजन

प्रतिनिधी, बुलडाणा : छत्रपती शाहू महाराज  जयंतीनिमित्त बुलडाणा येथे समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या  प्रांगणातून छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर समता दिंडीला हिरवी झेंडी दाखवली. ही समता दिंडी शहरातील विविध मार्गाने भ्रमण करत या दिंडीचा समारोप जिल्हा परिषदेत झाला. या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पोस्टर संदेश यात्रेच्या माध्यमातून आणि पथनाट्य भारुडाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचण्याचे करण्यात आले. या दिंडीमध्ये जिल्हा परिषदेचे उप मुख्याधिकारी अधिकारी राजेश लोखंडे, समाज कल्याण विभागाच्या आयुक्त अनिता राठोड,  मनोज मेरत यांच्यासह समाजकल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी या समता दिंडीमध्ये सहभागी झाली होते.