जनतेज न्युज

बंडखोर आमदारांच्या विरोधात प्रतीकात्मक अंतयात्रा काडुन शिवसैनिकांचा मोर्चा

प्रतिनिधी, नाशिक : नाशिक मध्ये बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ते अमरधाम पर्यंत मोर्चा काढून प्रतिकात्मक पुतळ्याचे अमरधाम मध्ये प्रथमच दहन करण्यात आले.गेल्या पाच-सहा दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदार मुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना शिवसैनिक राज्यात ठिकठिकाणी आक्रमक होताना दिसते आहे.नाशिक मध्ये आज शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून अमरधाम पर्यंत तीन किलोमीटर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना चपला व बूटे मारण्यात आले. यावेळी बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अमरधाम मध्ये मोर्चा पोहोचल्यानंतर बंडखोरांची प्रतिकात्मक काढलेल्या अंतयात्रेचे अग्नी देऊन दहन करण्यात आले.