जनतेज न्युज

मंत्री अब्दुल सत्तर आणि संदीपान भुमरे यांच्याशी माझं बोलणं झालं,दोघंही माझ्या संपर्कात – अर्जुन खोतकर

प्रतिनिधी, जालना : राज्याबाहेर गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांशी अजूनही  परत येण्यासाठी शिवसेनेकडून संपर्क सुरूच असल्याची माहिती शिवसेनेचे माजी राज्यमंत्री आणि जालना जिल्ह्यातील नेते अर्जुन खोतकर यांनी दिलीय.येत्या 28 तारखेला जालन्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हा शिवसेनेची एक बैठक पार पडली.या बैठकीनंतर ते बोलत होते.अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे माझ्या संपर्कात असल्याचंही खोतकर यांनी म्हटलं आहे.राज्याबाहेर गेलेले आमदार पुन्हा परत येतील असा विश्वास देखील खोतकर यांनी व्यक्त केला.दरम्यान मि फक्त  2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहे या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर खोतकर यांनी राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार सत्तेत कायम राहील असं म्हटलं आहे.