जनतेज न्युज

कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपस्थित राहणाऱ्या सदस्य, अधिकारी , कर्मचारी अशा 75 लोकांची कोरोना टेस्ट ला सुरवात….

प्रतिनिधी , पंढरपूर : कोरोनाच्या सावटाखाली कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा 26 नोव्हेंबर रोजी संपन्न होताहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ही महापूजा होणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाने महापूजेवेळी मंदिरात उपस्थित राहणारे समितीचे सहअध्यक्ष , सल्लागार मंडळा सह अधिकारी, कर्मचार्याची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. 75 जणांची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील त्यांचाच मंदिरात प्रवेश देणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिलीय.