जनतेज न्युज

किनगाव अपघातातील मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनातर्फे दोन लाखाचा निधी – गुलाबराव पाटील पालकमंत्री

प्रतिनिधी , जळगाव : धुळे येथून पपई घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाचा रात्री एक वाजण्याच्या सुमारास यावल तालुक्यातील किनगाव येथेअपघात झाला या अपघातामध्ये पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व दोन रुग्णांवर ती जळगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या अपघाताची पाहणी करण्यासाठी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज आले होते त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार कडून अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दोन लाखाचा निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे मनाला हेलावून टाकणारी ही दुर्दैवी घटना घडली आहे माझ्या आयुष्यामध्ये मी सर्वात मोठी घटना पाहतोय असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे