प्रतिनिधी , नांदेड : प्रशासनाच्या विविध विभागामध्ये शासकिय कामकाजात गती आणण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांच्या संकल्पनेतून प्रशासन आपल्या गावी हे अभियान जिल्हाभर राबविण्याची संकल्पना आखल्याने किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील इस्लापूर येथे प्रशासन आपल्या गावी हे अभियान राबवण्यात आले. प्रशासन आपल्या गावी या अभियानामध्ये २३ गावांच्या नागरिकांनी सहभाग नोंदवून नागरिकांनी विविध विषयावर काही आपल्या तक्रारी तहसीलदार उत्तम कागणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मांडल्या.
कुपटी गावचे सरपंच शिवाजी भुरके, रोडा नाईक तांडा येथील सरपंच प्रकाश राठोड, नंदगाव येथील सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील, पांगरी येथील सरपंच प्रतिनिधी शंकर नरोटे, अशा विविध गावच्या सरपंचांनी विविध समस्या मांडल्या असता तहसीलदार उत्तम कांगणे यांनी येथेच तक्रारीचा निपटारा करून शासकीय कामात गती आणली. सरपंच महिला शारदा शिनगारे व उपसरपंच निर्मलाबाई दुरपडे पाटील यांच्या हस्ते जातीचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी दिव्यांग व वृद्ध अपंगांना शासकीय अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले आहे. अशा या अभियानामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र विद्युत विभाग, भूमी अभिलेख विभाग, वन विभाग, अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. अशी माहिती तहसीलदार उत्तम कांगणे यांनी यावेळी दिली.
