प्रतिनिधी , उस्मानाबाद : कांदा शेती म्हणजे जुगार, आला तर पैसा नाहीतर नासका पण नाशिबाने माळकरंजा येथील कृष्णा भगवान कवडे यांना आवघ्या ३५ गुठ्यात सव्वा सहा लाख रुपयांचे काद्यांचे उत्पन्न घेतले आहे.
कृष्णा कवडे यांची घरची परिस्थिती हलाकीची असुन त्यांना रोज दुसऱ्याच्या शेतात कामाला जाण्याशिवाय पर्याय नाही. इतरांच्या शेतात रोजंदारीने काम करत, आपल्या नातेवाईकांच्या मार्गदर्शनाने जवळपास ५० हजार रु. खर्च करून घरीच तयार केलेल्या हरण्या फुरसुंगी कांद्याची ३५ गुंठे जमीनीवर लागवड केली. त्यांनी लागवड केलेल्या या कांद्याला बाजारात चांगला भाव मिळाला असुन अवघ्या ३५ गुंठ्यात सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न कृष्णा कवडे यांनी घेतले आहे.
